मोबाइलमध्ये शुटिंग घेतल्यावरून मारहाण
By Admin | Updated: March 26, 2016 02:22 IST2016-03-26T02:22:33+5:302016-03-26T02:22:33+5:30
महिलेची मोबाइलमध्ये शुटिंग का घेतली, या कारणाहून दोन युवक व एका महिलेला मारहाण.

मोबाइलमध्ये शुटिंग घेतल्यावरून मारहाण
जउळका रेल्वे (जि. वाशिम): घराशेजारी राहणार्या महिलेची मोबाइलमध्ये शुटिंग का घेतली, या कारणाहून दोन युवक व एका महिलेला मारहाण केल्याची घटना खिर्डा येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीहून चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. खिर्डा येथील कुसुम बद्री चव्हाण या महिलेने फिर्याद दिली की, २४ मार्च रोजी पुणे येथे कंपनीत काम करणारे तिची दोन मुले होळीनिमित्त खिर्डा येथे आले आहेत. घराशेजारी राहणारे कमरुसिंह जाधव, दिलीप जाधव, अंबर जाधव, संतोष जाधव, यांनी घरात येऊन प्रदीप नामक मुलाला म्हटले की, तू महिलेचे फोटो व शुटिंग मोबाइलमध्ये का काढले, या कारणाहून दोन्ही मुलांना बेदम मारहाण करून जिवाने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी कमलसिंह जाधव, दिलीप जाधव, अंबर जाधव, संतोष जाधव या चौघांवर कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला.