‘शिरपूर’ हळद उत्पादनात विदर्भात प्रसिध्द
By Admin | Updated: November 19, 2016 02:24 IST2016-11-19T02:24:15+5:302016-11-19T02:24:15+5:30
‘काटा’ नंतर आता शिरपूर जैन येथेही पितक्रांती.

‘शिरपूर’ हळद उत्पादनात विदर्भात प्रसिध्द
वाशिम, दि. १८- अकोला-वाशिम जिल्हा एकत्र असतांना हळद उत्पादन व प्रक्रीयेसाठी ह्यकाटाह्ण गाव प्रसिध्द होते. आजच्या घडीला हळदीचे सर्वाधिक उत्पन्न घेणार्या गावांमध्ये विदर्भात ह्यशिरपूरह्ण गावाचा नामोल्लेख होत आहे. येथील हळद मराठवाडा, आंध्रप्रदेशसह संपूर्ण विदर्भात पोहचली आहे. येथील २ एकरापासून ते ३0 एकरापर्यंंत शेती असलेले शेतकरी हळदीचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. शिरपूर येथील नंदकिशोर उलेमाले या उच्चशिक्षित शेतकर्यासह गावातील अनेक शेतकर्यांनी पाच एकरामध्ये विक्रमी उत्पादन घेतले आहे. हळद उत्पादक शेतकर्यांनी केलेल्या खर्च वजा जाता प्रत्येक शेतकर्यांला एकरी एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.