वाशिम नगर पालिकेच्या स्विकृत सदस्यपदी शिंदे अविरोध
By Admin | Updated: November 12, 2014 23:23 IST2014-11-12T23:23:24+5:302014-11-12T23:23:24+5:30
जिल्हा विकास आघाडीचे संतोष शिंदे यांची अविरोध निवड.

वाशिम नगर पालिकेच्या स्विकृत सदस्यपदी शिंदे अविरोध
वाशिम : स्थानिक नगर परिषदेच्या ११ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या स्विकृत सदस्य पदाच्या निवडणुकीत येथील जिल्हा विकास आघाडीचे संतोष शिंदे यांची अविरोध निवड करण्यात आली.
पालिकेचे स्विकृत सदस्य असलेले आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधासभेची निवडणूक जिंकल्यानंतर स्विकृत सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी १२ नोव्हेंबरला निवड प्रक्रिया आयोजित केली होती. सदर जागेवर संतोष शिंदे यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हा विकास आघाडीचे गटने ता अँड.गुरुनामसिंग गुलाटी यांनी आघाडीचे उमेदवार म्हणून संतोष शिंदे यांचे एकमेव नाव सुचविले. त्यामुळे शिंदे यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. अशी माहिती मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी दिली.यावेळी नगराध्यक्षा ल ताताई उलेमालेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.