शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

अलीकडच्या दहा वर्षांत स्मार्टफोन अनेकांच्या हाती आला आहे. या स्मार्ट फोनवर व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाचा ...

अलीकडच्या दहा वर्षांत स्मार्टफोन अनेकांच्या हाती आला आहे. या स्मार्ट फोनवर व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाचा वापर सहजशक्य असल्याने अनेक जण वेळ घालविण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी या सोशल मीडियाचा मनसोक्त वापर करतात. या मीडियावर काही समाजभान नसलेल्या आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा आहे. ही मंडळी जहाल, तीव, भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या, वात्रट पोस्टच शेअर करण्यावर अधिक भर देतात. यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून शेअर झाली, लाईक किंवा फॉरवर्ड झाली, तर तुमच्यावरही माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.

----------

कोट: -

सोशल मीडियाचा वापर सर्वांनी काळजीपूर्वक करावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, वात्रट, व्हल्गर पोस्टला लाइकही करू नये. या बाबींचे पालन केल्यास तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहू शकता.

- रहिम शेख,

सहा. पोलीस निरीक्षक, सायबर विभाग

-------

बॉक्स :

मुलींनो, डीपी सांभाळा

काही तरुणी व्हॉट्स ॲपसारख्या सोशल मीडियावर आपले स्वत:चे छायाचित्र डीपी म्हणून ठेवतात. मात्र याच डीपीचा वापर करून सायबर गुन्हेगार अश्लील पोस्ट तयार करणे किंवा गैरवापर करून बदनामीचा प्रयत्नही करू शकतात. यामुळे तरुणींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असून, आपल्या छायाचित्राचा गैरवापर टाळण्यासाठी स्वत:चे छायाचित्र न ठेवता निसर्गचित्र, सुभाषितांची छायाचित्रे, ठेवणे कधीही योग्यच ठरते.

----------------

बॉक्स:

सोशल मीडियाचा वापर करा जपून

एफबी, व्हॉट्स ॲप आणि यु-ट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रक्षोभक, अश्लील मेसेजेस शेअर होतात. अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही व्हॉट्स ॲप, फेसबुकचे जणू व्यसनच लागले आहे. सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला जगाशी कनेक्ट होता येते, पण त्याचा अतिवापर टाळण्याची गरज आहे. माहितीची सत्यता पडताळून जर ती शेअर केली, तर लोकांना चांगली आणि योग्य माहिती मिळू शकते.

-------

बॉक्स :

अशी घ्या काळजी...

- सोशल मीडियाचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यप्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत.

- एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय एफबी किंवा व्हॉट्स ॲपवर उपलब्ध आहे.

- एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जाऊ शकते.

- मेसेज शेअर किंवा लाईक करताना आपण काही चुकीचं पाठवत नाही ना, याचे भान आपणच राखले पाहिजे.