शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

By Admin | Updated: May 1, 2017 01:52 IST2017-05-01T01:52:35+5:302017-05-01T01:52:35+5:30

मोहन भागवत : वाशिममध्ये आदि शंकराचार्य जयंती महोत्सव

Shankaracharya should be formed on a seven-point basis nation! | शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

वाशिम : आदि शंकराचार्यांनी सत्य, करूणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब क रून सनातन धर्माची स्थापना केली. त्याच चतु:सूत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत देशातील १२५ कोटी जनतेने राष्ट्रनिर्माणात हातभार लावावा, असे अवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी केले.
स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आदि शंकराचार्य यांचा जयंती महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. भागवत म्हणाले, की पुर्वीच्या सनातन धर्माचे आधुनिक रुप म्हणजे हिंदू होय. त्यावरूनच देशाचे नाव हिंदूस्थान पडले असल्याचे प्रतिपादन भागवत यांनी केले.
या कार्यक्रमास श्रुतिसागर आश्रम, फुलगांव (पुणे)चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रमुख आचार्य माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्यासह श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत डॉ. रामराव महाराज, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदौरचे संत बाबा महाराज तराणेकर, वासुदेव आश्रम अभ्यासिका, वाशिमचे विजयकाका पोफळी महाराज यांची विशेष उपस्थिती; तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक आदिंची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनीही उपस्थितांना मागदर्शन केले.
याप्रसंगी भगवतत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्काराने बडवाह (मध्यप्रदेश) येथील श्रीराम महाराज यांना; तर वेदसंवर्धन पुरस्काराने चैतन्य नारायण काळे (सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: Shankaracharya should be formed on a seven-point basis nation!