वृक्ष वाचविण्यासाठी सावली प्रतिष्ठानचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:31 IST2017-08-18T19:28:45+5:302017-08-18T19:31:26+5:30

वाशिम - रस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षांची तोड होत असल्याने सदर वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी मागणी सावली प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे १८ आॅगस्ट रोजी करण्यात आली.

The shadow establishment initiative to save the trees | वृक्ष वाचविण्यासाठी सावली प्रतिष्ठानचा पुढाकार

वृक्ष वाचविण्यासाठी सावली प्रतिष्ठानचा पुढाकार

ठळक मुद्देरस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षांची तोड वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा - मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - रस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षांची तोड होत असल्याने सदर वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी मागणी सावली प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे १८ आॅगस्ट रोजी करण्यात आली.
स्थानिक बसस्थानक ते विश्राम गृह, सिव्हिल लाईन वाशिम येथील रस्ते रुंदीकरणासाठी तोडण्यात येणाºया वृक्षांना वाचविण्याची मागणी निसर्ग व्यासंगी सावली प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वीही केली होती. सदर वृक्ष न तोडता पर्यायी व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी प्रतिष्ठानतर्फे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांना देखील भावनिक पत्र पाठवुन वृक्ष वाचविण्याची विनंती केली. अलीकडेच शासनाने सुरू केलेल्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत भव्य वृक्ष लागवडीसाठी अनेक संस्थानी पुढाकार घेतला. एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी सावली प्रतिष्ठान सारख्या अनेक निसर्ग व्यासंगी संस्था पर्यावरणप्रेमी मंडळीनी अहोरात्र झटायचे आणि दुसरीकडे विकास कामांत अडथळा निर्माण होत असल्याचे कारण सांगून वृक्षांवर कुºहाड मारायची, हा प्रकार सुरू असल्याचे सावली प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली.
रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड महत्वाची आहे का? अशा प्रकारचा भावनिक प्रश्न सावली प्रतिष्ठानच्या वतीने प्रशासनाला विचारून वृक्ष वाचविन्यासाठी प्रयत्न करावे, अशी अशी विनवणी करण्यात आली. यावेळी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम धनगर, वैभव गौरकर, सुनील हेंद्रे, रुपेश काबरा, प्रवीण होनमने, रोहिदास धनगर, अजय यादव, पंकज गाडेकर, सचिन घुगे, वृषाली बर्डे, वैभव घुगे, प्रा.सुरज डोंगरे, ज्ञानेश्वर नवघरे, किशोर वाणी,ओम वानखेडे, अभिशेक मत्ते, प्रदिप फाडे, हर्षल अंभोरे, सतिष मोकाडे, प्रसाद राखुंडे, कपिल भोयर, शिवम आरु, साईनाथ आडे, आकाश गोदारा, ज्ञानेश्वर उगले आदींची उपस्थिती होती.

Web Title: The shadow establishment initiative to save the trees