कृषी चिकित्सालयातील शेडनेटची दुरवस्था
By Admin | Updated: May 25, 2014 00:08 IST2014-05-24T22:35:43+5:302014-05-25T00:08:08+5:30
मंगरूळपीर तालुका कृषी चिकीत्सालयातील प्रकार!

कृषी चिकित्सालयातील शेडनेटची दुरवस्था
मंगरूळपीर: शेतकर्यांना अल्पदरात विविध फळलागवडीचे रोपे उपलब्ध व्हावे या उदात्त हेतुने शासनाने शेडनेटच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र शेडनेटची सुरूवातीलाच दुरवस्था झाल्याने रोपे लावणे कठीण झाले आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी पारंपरिक पिकाऐवजी अल्प कालावधीत येणार्या फळलागवडीकडे वळून अल्पावधीत भरघोस उत्पन्न घ्यावे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन शासनाने तालुका कृषी चिकीत्सालयामध्ये २00९ -१0 मध्ये भव्य शेडनेट उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मात्र शेडनेट अर्धवट स्थितीमध्ये असून शेडनेटचे लोखंडी अँगल तुटून ते जमिनदोस्त झाले आहे. तसेच शेडनेटची जाळी तुटलेली आहे व प्रवेशद्वार पुर्णत: खिळखिळे झाले आहे. याशिवाय शेडनेटच्या या जागेमध्ये वापर होत नाही. या शेडनेटची व्यवस्थितरित्या उभारणी झाली असती तर या शेडनेटमधील विविध फळलागवडीच्या रोपामधून लाखो रूपये उत्पन्न मिळाले असते. तसेच नॅडेप खत प्रक्रिया केंद्र बंद अवस्थेत असून याविषयी मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झाले आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.