अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: October 26, 2015 01:50 IST2015-10-26T01:50:06+5:302015-10-26T01:50:06+5:30

डही येथील प्रकार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Sexual exploitation of a minor girl | अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

मालेगाव (जि. वाशिम): तालुक्यातील किन्हीराजा येथील एका युवकाने डही येथील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीहून आरोपी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. डही येथील एक अल्पवयीन मुलगी मालेगाव येथे शाळेत शिक्षण घेत आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शाळेत ये-जा करत असताना हर्षद तायडे रा. किन्हीराजा हा पाठलाग करत होता. सदर आरोपी युवक तिला नेहमीच त्रास देत होता. चार ते पाच महिन्यांपूर्वी डही फाट्यावरून शाळेतून घरी जाताना आरोपी युवकाने पीडित मुलीला बाजूला नेऊन जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. तसेच या प्रकरणाची कुठे वाच्यता केली तर जिवाने मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलीने अकोला येथील खासगी रुग्णालयात दिलेल्या जबानीत कथन केला. याप्रकरणी अकोला खदान पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. सदर प्रकरण मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मालेगाव पोलिसांनी २५ ऑक्टोबरला आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, लैंगिक अ पराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २0१२ नुसार ४,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत.

Web Title: Sexual exploitation of a minor girl