कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST2021-06-16T04:53:52+5:302021-06-16T04:53:52+5:30

----------- रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती वाशिम : उंबर्डाबाजार-जांब या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या ...

Sewage on the road in Kamargaon area | कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी

कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी

-----------

रस्त्यावरील गटारामुळे अपघाताची भीती

वाशिम : उंबर्डाबाजार-जांब या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत. ही कसरत करताना नियंत्रण सुटल्यास अपघात घडण्याची भीती असल्याने या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

-------------------

धनज येथे खरीपपूर्व कार्यशाळा

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर असल्याने कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. या अंतर्गत शनिवारी धनज परिसरातील शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.

---------------

पोहरादेवीत नागरिकांची आरोग्य तपासणी

वाशिम: कोरोना विषाणूबाधित रुग्ण पोहरादेवी येथे आढळल्यानंतर मानोरा तालुका आरोग्य विभागाने परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत पोहरादेवीत २०० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

---------------

Web Title: Sewage on the road in Kamargaon area