वाशिम शहरातील अनेक प्रभागांना रस्त्यांची प्रतीक्षा कायम
By Admin | Updated: October 27, 2014 00:39 IST2014-10-27T00:39:26+5:302014-10-27T00:39:26+5:30
रस्त्याविना अवागमन झाले त्रासाचे नगर पारिषद लक्ष देईल काय ?

वाशिम शहरातील अनेक प्रभागांना रस्त्यांची प्रतीक्षा कायम
वाशिम : वाशिम शहरातील नवीन आययूडीपी आणि विनायक नगरातील रस्त्यांना डांबरीकरण किंवा खडीकरणाची प्रतीक्षाच आहे. नवीन आययूडीपीत वसाहत तयार होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटत आहे. या पाच वर्षात बर्याच सुविधा उपलब्ध झाल्या आहेत; मात्र काही सुविधांना अजूनही प्रतीक्षाच आहे. या भागातील काही गल्लीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय हो त आहे. कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात वाहन फसण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मुख्य रस्ता सोडला तर इतर अंतर्गत रस्त्यावर सायकल, मोटारसायकलसुद्धा घरापर्यंत नेता येत नाही. पावसाळय़ामध्ये तर हातात चप्पल घेऊन चिखलातून घराचा मार्ग शोधावा लागतो. रस्ता, वीज व पाणी या तीन मूलभूत सुविधा म्हणून ओळखल्या जातात. यापैकी रस्ता ही समस्या या नगरात गंभीर बनत चालली आहे. मुख्य रस्ता बर्यापैकी आहे; मात्र अंतर्गत रस् त्यांची वाट लागली आहे. नवीन रस्ता तयार करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अजूनही या मागणीला हिरवी झेंडी मिळाली नाही. घरपट्टी, नळपट्टी व इतर कर वेळेवर वसूल करणार्या प्रशासनाने तेवढय़ाच तत्परतेने मूलभूत सुविधादेखील पुरवाव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.