आणखी सात जणांचा मृत्यू; ४२८ कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST2021-05-13T04:41:50+5:302021-05-13T04:41:50+5:30
जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढत आहे. गत २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद बुधवारी ...

आणखी सात जणांचा मृत्यू; ४२८ कोरोना पॉझिटिव्ह!
जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढत आहे. गत २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद बुधवारी घेण्यात आली. बुधवारी प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण ४२८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम तालुक्यात १०२, मालेगाव तालुक्यातील १०६, रिसोड तालुक्यातील ८५, मंगरूळपीर तालुक्यातील ३५, कारंजा तालुक्यातील ६४ आणि मानोरा तालुक्यात ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३० बाधितांची नोंद झाली असून ४२४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००००००००००
मानोरा तालुक्यात सहा रुग्ण
गत तीन, चार मानोरा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. बुधवारच्या अहवालानुसार मानोरा तालुक्यात सहा रुग्ण आढळून आल्याने ही बाब तालुकावासीयांसाठी किंचितशी दिलासादायक ठरली आहे. बुधवारी मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.
००
एकूण पॉझिटिव्ह ३३४४१
ॲक्टिव्ह ४३१७
डिस्चार्ज २८७७५
मृत्यू ३४८