सात सदस्यीय समितीचे होणार गठन
By Admin | Updated: April 21, 2017 01:32 IST2017-04-21T01:32:07+5:302017-04-21T01:32:07+5:30
वाशिम- वृक्षतोड थांबविण्यासाठी नगराध्यक्षांसह नगर परिषदेतील अधिकाऱयंशी चर्चा होऊन सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सात सदस्यीय समितीचे होणार गठन
वाशिम: शहर सौंदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. १३ एप्रिल रोजी रस्ता रुंदीकरण रस्त्याची नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाहणी करून आखणी केल्याने सदर बाब पुढे आली आहे. रस्त्यावरील वृक्ष कायम ठेवण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन सदर प्रकार रोखण्यचा प्रयत्न केला. वृक्षांची तोड होऊ नये याकरिता लोकमतच्या वतीने १५ एप्रिल व १७ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. यावर नगराध्यक्षांसह नगर परिषदेतील अधिकाऱयंशी चर्चा होऊन सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गत दोन वर्षाआधी आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले तेव्हा याही रस्त्यावरील ४० ते ५० झाडे कापण्यात आली होती.
ते अद्याप लावण्यात आलेली नसताना पुन्हा आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन रस्त्यावरील झाडांवर कुऱ्हाड चालणार असल्याने विविध संघटना आक्रमक होऊन याला विरोध दर्शविला.
याबाबतचे सर्वप्रथम वृत्त अग्रकमाने लोकमतने प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता. तसेच यासंदर्भात विविध संघटनांच्या पदाधिकारयांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी यांना भेटून या संदर्भात निवेदन सादर करून चार्च केली होती. गत दोन दिवसाआधिी काही नागरिकांनी नगराध्यक्ष अशोक हेडा व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी यासठी वृक्षसंवर्धन संघटनेच्या सात सदस्यीय समितीची स्थापना करून कोणते झाड काढायचे व कोणते ठेवायचे यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तसेच रस्ता रुंदीकरणाचा उदेश असून, वृक्ष कापण्याचा यामागे कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटनेचे सचिव प्रविण जोशी, मानद वन्यजीव रक्षकचे प्रशांत जोशी, राजे उदाराम कॉलनी, सिव्हिल लाइन भागातील नागरिक, राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेसह वृक्षप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.
--