शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री, सात आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 17:18 IST

Seven accused arrested for selling underage girls : वाशिम शहर पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात गुरुवारी यश मिळवले.

वाशिम : वडिलांच्या निधनानंतर मुलींना नातेवाईकांनी पालन करण्याची हमी देऊन घरी नेले आणि चार लाख रुपयात परराज्यात राजस्थान येथर परस्पर विक्री केल्याची घटना  उघडकीस आली असून, या प्रकरणामध्ये वाशिम शहर पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात गुरुवारी यश मिळवले. यामध्ये सात आरोपींना अटक केली असून २६ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळाला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वाल्मीकि नगर येथे राहणाऱ्या कल्पना अशोक पवार यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी सदर प्रकरणी तक्रार दिली होती.या फिर्यादीत बहिणीच्या नवऱ्याच्या निधनानंतर बहिणीच्या ११ व ८ वर्षांच्या दोन मुली नातेवाईक असलेल्या घनशाम रामकिसन पवार रा.हदगाव जिल्हा यवतमाळ व जयंत पवार रा.बोरी यवतमाळ यांनी दोन्ही मुलींना आपल्या सोबत नेले आणि फिरावयाच्या बहाण्याने मुंबई येथे नेले.त्यानंतर मोठ्या मुलीला राजस्थान येथे चार लाख रुपयात तिला विकले.आणि मुलगी न सांगता पळून गेली अशी थाप आपणास मारली असे फिर्यादीत नमूद केले.या पीडित मुलीला राजस्थानातील डागरा येथे विकल्यानंतर संदीप हनुमानसिंग बांगडवा या आरोपी सोबत तिचे लग्न लावून दिले.आरोपी संदीप बांगडवा याने अल्पवयीन पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले.तसेच मदन हनुमानसिंग बांगडवा,राकेश हनुमानसिंग बांगडवा यांनी सदर मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केला.या जाचाला कंटाळून पीडित मुलीने तेथून पळ काढून गुजरात गाठले.या घटनेची माहिती पीडित मुलीने बारडोली पोलिसांना दिली.बारडोली पोलिसांनी वाशिम पोलिसांना काळविल्या नंतर या माहितीच्या आधारे वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी घनश्याम पवार व राजेंद्र पवार यांना अटक करून ताब्यात घेतले.त्यानंतर एक पथक गुजरातमध्ये पाठवून पीडित मुलीला ताब्यात घेतले.अटकेतील आरोपींनी सुभाष पवार बाबत सदर गुन्ह्यातील सहभाग असल्याची माहिती दिल्यानंतर सुभाष पवारला पालघर जिल्ह्यातुन अटक करण्यात आली.पीडित मुलीला वाशिम येथे आल्यानंतर तिने घनश्याम रामकीसन पवार,जयेंद्र रामकीसन पवार व सुभाष श्यामराव पवार यांनी  चार लाख रुपयात मदन हनुमानसिंग बांगडवा,राकेश हनुमानसिंग बांगडवा व संदीप हनुमानसिंग बांगडवा यांना विकल्याची माहिती दिली.वाशिम शहर पोलिसांनी लगेच राजस्थान गाठून या तिन्ही आरोपींना राजस्थानातुन अटक केल्यानंतर या प्रकरणामध्ये घनश्याम पवार व राजेंद्र पवार यांच्या सह मुलीला विकण्यास मदत करणाऱ्या इस्लाम खान दौलत खान राहणार दिग्रस त्याला सुद्धा अटक केली आहे.शहर पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण,उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे शहर पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकार,सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे,पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ,अनिल पाटील,गणेश सरनाईक,विजय घुगे,लालमणी श्रीवास्तव,रामकृष्ण नागरे,ज्ञानदेव मात्रे,सुभाष राठोड,विठ्ठल महाले,प्रवीण गायकवाड,मनोज पवार,तेजस्विनी खोडके व सायबर पथकाचे दीपक घुगे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी