बंदोबस्त अधिकारी बदलला
By Admin | Updated: November 29, 2014 23:42 IST2014-11-29T23:42:34+5:302014-11-29T23:42:34+5:30
लोकमतच्या वृत्तानंतर पोलिस हरकतीत : रिसोड तालुक्यातील अवैध धंद्यांवर टाच.

बंदोबस्त अधिकारी बदलला
रिसोड ( वाशिम) : लोणी यात्रा महोत्सवात खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचे पुराव्यानिशी सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पोलिस प्रशासनासह सर्वत्र एकच खळबळ उडाली. लोकमत वृत्ताची गांभीर्यपुर्वक दखल घेत वरिष्ठ अधिकार्यांच्या सुचनेवरुन ठाणेदार सुरेशकुमार राउत यांनी यात्रेमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायाच्या प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीअंती दोषी आढळलेल्या बीट इनजार्च बंदोबस्त अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर.एस.नरुटे यांचा चार्ज काढून त्यांचे जागेवर नविन बंदोबस्त अधिकारी म्हणून एपीआय विजय रत्नपारखी यांची नियुक्ती केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक नरुटे यांना दैनंदिन ड्युटीवर रिसोड पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. यात्रेमध्ये यावेळी अवैध व्यवसायाचे बस्तान काहींनी मांडले होते. अर्थात त्यांना स्थानिक पोलिसांची सुद्धा ह्यअर्थपूर्णह्ण मुकसंमती होती त्याच कारणाने यात्रेच्या प्रारंभी दिवसात अवैध व्यवसाय दिवस रात्र बिनबोभाट सुरु होते यामध्ये वरली-मटका, तितली भवरा, तीन पानी पत्ता, त्रिरट, ऐक्काबादशहा, दारुसह आदी व्यवसाय खुलेआम सुरु होते. यामध्ये ग्रामीण भागातील शेकडो शौकीन दिवसाची मेहनतीची छोटीशी कमाई मोठया लालसेपाटी जुगाराचा डावात हरताना दिसत. लोणी यात्रेतील याच खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचे माहिती लोकमत सचित्र प्रकाशीत केली होती.