निराधार महिलांसाठी राजगृह उभारावे
By Admin | Updated: February 28, 2015 01:01 IST2015-02-28T00:52:31+5:302015-02-28T01:01:57+5:30
सामाजिक संस्थांद्वारे वाशिम जिल्ह्यात निराधार स्त्रीयांसाठी राजगृहाची मागणी.

निराधार महिलांसाठी राजगृह उभारावे
वाशिम : जिल्हा होवून अनेक वर्षे लोटली तरी जिल्हयाच्या ठिकाणी निराधार, विधवा, परितक्त्या, निराश्रीत महिला, अन्यायग्रस्त महिला तसेच अन्यायग्रस्त महिलांचे हक्काचे महिला राजगृह अद्यापही उभारण्यात आले नाही. अशा महिलांकरीता जिल्हयाच्या ठिकाणी जागा देवून महिला राजगृह उभारावे अशी मागणी युवक-युवती मित्र, राजरत्न अल्पसंख्यांक बहुउद्देशिय संस्था, नेहरु युवा मंडळांच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद आहे की, वाशीम जिल्हा होऊन तब्बल सतरा वर्षे उलटली तरी अजून जिल्हयाचे मागासलेपण संपलेले नाही. त्यामुळे जिल्हा केवळ नावापुरताच उरला का असाही प्रश्न येत आहे. कारण अद्यापही कित्येक शासकीय कार्यालये जिल्हयाच्या ठिकाणी सुरु झाली नाहीत. महिलांसंदर्भात शासन अनेक योजना राबवित आहे. महिला सबळीकरणाच्या घोषणा एकीकडे दिल्या जात आहेत तर दुसरीकडे जिल्हयाच्या ठिकाणी निराधार, विधवा, परितक्त्या, निराश्रीत महिला, अन्यायग्रस्त महिला तसेच अन्यायग्रस्त महिलांचे हक्काचे महिला राजगृह अद्यापही उभारण्यात आले नाही. त्यामुळे अशा निराश्रीत व निराधार महिला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दुर जात आहेत. अशा कित्येक महिला राजगृह नसल्यामुळे आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देवू शकत नाहीत. अशा दुर्बल महिलांसाठी महिला राजगृहाची गरज असून महिला राजगृह झाल्यास कित्येक वंचित व दुर्बल महिलांना न्याय मिळू शकेल. त्यामुळे जिल्हयाच्या ठिकाणी महिला राजगृह उभारण्यासंदर्भात शासकीय स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनक र्त्यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.