शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

ग्रामपंचायत स्तरावर १० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 18:37 IST

Washim News : १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवकांना २२ मे रोजी दिले.

वाशिम : दुसºया लाटेत वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सरकारी कार्यालयाच्या इमारतीत किमान १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवकांना २२ मे रोजी दिले. यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्याच्या सूचनाही दिल्या.दुसºया लाटेत ६० वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांनादेखील संसर्ग झाला आहे. युवकदेखील कोरोनाला बळी पडले. ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तिसºया लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्तरीय समितीने अधिक सतर्क राहणे आवश्यक असून, गावातच शासकीय इमारतीमध्ये किमान १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले.पाण्याची व्यवस्था, शौचालय, पंखा अशा सुविधा असणाऱ्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित कराव्यात. आवश्यकतेप्रमाणे १५ व्या वित्त आयोगातून पाण्याची व्यवस्था, शौचालय, पंखा अशा सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ज्या व्यक्तींना ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधूमेह, फुफुसांचे आजार, श्वसनास त्रास यासारखे लक्षणे आढळून आल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करावी, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम