ट्रॅक्टरच्या धडकेत एक गंभीर
By Admin | Updated: April 5, 2016 01:38 IST2016-04-05T01:38:20+5:302016-04-05T01:38:20+5:30
वाशिम येथे अपघातात इसम गंभीर जखमी.

ट्रॅक्टरच्या धडकेत एक गंभीर
वाशिम: ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना स्थानिक शिवाजी शाळेसमोर दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पाटणी चौकाकडे जाणार्या एका अज्ञात ट्रॅक्टरने पायदळ चालणार्या इसमाला मागून धडक दिली. यामध्ये इसम गंभीर जखमी झाला असून, त्याला खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनला नोंद नसल्याने ट्रॅक्टर व जखमीचे नाव समजू शकले नाही.