आघाडी सरकारच्या राजवटीत घोटाळय़ांची मालिकाच!
By Admin | Updated: October 13, 2014 00:54 IST2014-10-12T23:39:28+5:302014-10-13T00:54:38+5:30
वाशिम जिल्ह्यातील जाहीर सभेत अमित शहा यांची टीका.

आघाडी सरकारच्या राजवटीत घोटाळय़ांची मालिकाच!
कारंजा लाड (वाशिम): राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने १५ वर्षांच्या राजवटीत घोटाळय़ांशिवाय काहीच केले नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केली.
महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रचारसभा रविवारी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यात आजवर ३५ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. आघाडी सरकारने मात्र सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा असे विविध घोटाळे करून ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. काँग्रेसने शेतकर्यांसाठी पॅकेज जाहीर केले; परंतु पॅकेजचे पैसे शेतकर्यांपर्यंत पोहोचलेच नाही. सुजलाम, सुफलाम महाराष्ट्र आघाडी सरकारने कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न करून, भाजपशासित राज्यांमध्ये चांगला विकास झाल्याचा दावा शहा यांनी केला.
नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपने सर्वप्रथम देशाला बोलणारा पंतप्रधान दिला. त्यांच्या वकृत्व शैलीने सं पूर्ण जग भारावले, असे शहा यांनी सांगितले. गत ६0 वर्षांत देशातील ५0 टक्के नागरिकांचे बँकेत खातेच उघडले नाही. भाजपने जनधन योजना जाहीर केली आणि या योजनेंतर्गत देशातील पाच कोटी नागरिकांनी बँकेत खाते उघडले. त्यामुळे १ लाखांचे विमा संरक्षण त्यांना मिळाले. देशाचा विकास दर ८.४ टक्के असताना काँग्रेस सरकार सत्तेवर आले. १0 वर्षांच्या काळात हा दर ४.२ टक् क्यांपर्यंत घसरला. भाजपने हा दर तीन महिन्यातच ५.७ टक्क्यांवर नेला, असे शहा यांनी सांगितले.
सीमेवर पाकिस्तानकडून होणार्या गोळीबाराबाबत काँग्रेसकडून केल्या जाणार्या आरोपांचा शहा यांनी समाचार घेतला. पूर्वी पाकिस्तानी सैनिक गोळीबार सुरू करायचे आणि थांबवायचेही तेच. आ ता चित्र बदलले आहे. गोळीबार आताही सुरू त्यांच्याकडूनच होतो; परंतु तो थांबवतात भारतीय सैनिक, असा टोला त्यांनी लगावला.
मोदींनी मेक इन इंडिया हा मंत्र देऊन, विदेशी कंपन्यांना बाजारपेठ मोकळी करून दिली; परंतु या देशात उत्पादने विकायची असतील, तर ती येथेच तयार करावी, असे आवाहन केल्यानंतर देशात ३ हजार कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखविली. पंतप्रधानांनी बेटी बचाव, स्वच्छ ता अभियान, आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केल्याचे स्पष्ट करून, मोदी सरकारने चार महिन्यात काय केले, हे सांगण्यासाठी भागवत सप्ताह आयोजित केला तरी, ते सांगता येणार नाही, असेही शहा म्हणाले.