एकांबा येथे विलगीकरण कक्षाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:29+5:302021-05-31T04:29:29+5:30
अनसिंग व परिसरातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक बाधित गृह विलगीकरणात असून ...

एकांबा येथे विलगीकरण कक्षाची सुविधा
अनसिंग व परिसरातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक बाधित गृह विलगीकरणात असून यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्तरीय समिती सतर्क झाली आहे. गावातच किमान १० बेडचा विलगीकरण कक्ष उभारावा, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असून जि.प. प्राथमिक शाळेत हा कक्ष उभारण्यात येणार आहे. त्याची पाहणी ठाणेदार नयना पोहेकर यांनी केली. याठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय, पंखा आणि गादी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे, गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांनी दिली. विलगीकरण कक्षाकरिता सरपंच नारायण चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून शाळेतील वर्गखोल्यांच्या स्वच्छतेचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.