विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप

By Admin | Updated: September 10, 2014 00:51 IST2014-09-10T00:51:16+5:302014-09-10T00:51:16+5:30

तालात थिरकले गणेशभक्त: दुसर्‍या टप्प्यात मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथे विसर्जन.

Sentimental messages to the wounded | विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप

विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप

मंगरूळपीर : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ९ सप्टेंबर रोजी येथील येथील भक्तांनी बाप्पांना जड अंतकरणाने निरोप दिला. तत्पूर्वी, शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या विसर्जन मिरवणूकीत भाविकांनी जल्लोष करीत गणेशाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेतले.
येथील संत बिरबलनाथ महाराज गणेश मंडळाच्या मूर्तीची आरती व पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. यावर्षी पोलीसांनी जय महाराष्ट्र, भारत, संकल्प, आदर्श, रामदेवबाबा, वीर भगतसिंग, साई यासह इतर काही सार्वज़निक गणेश मंडळांना मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांनी धम्माल केली. चौकाचौकात गुलालाची उधळण झाली. डीजेच्या तालावर भाविकांनी फेर धरीत बाप्पांचा जयजयकार केल्याने अवघे शहर दणाणले होते. काही गणेश मंडळाने पारंपरिक वाद्य वाजवून तर काहींनी आधुनिक डीजेवर गाणे वाजवून गणेशाला चोख पोलिसबंदोबस्तामध्ये निरोप दिला.

मानोरावासीयांनीही दिला निरोप
मानोरा : शहरात २९ ऑगस्टपासून प्रारंभ झालेल्या गणेशोत्सवाचा ९ सप्टेंबरच्या रात्री समारोप झाला. त्यानिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणुकीत भाविकांनी ढोल ताशांचा गजर करून गणेशाला निरोप दिला.
यावर्षी शहरात १0 गणेश मंडळाने सार्वजनिक मूर्तीची स्थापना केली होती. मिरवणुकीत भाविकांनी डीजे तालावर नृत्य केले. गणेशभक्तांनी एकमेकांवर गुलालाची उधळण करून गणपतीबाप्पांचा जयजयकार केला. शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीसांनी चोच बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुक सुरू होती.

मालेगाव : मागील १0 दिवसांपासून मालेगाव शहरात बाप्पांच्या आगमनामुळे भक्तीमय वातावरण तयार झाले होते. ९ सप्टेंबर रोजी भक्तीमय वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या चा निरोप देवून बाप्पांची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली.
शहरात गणपती विसर्जनाची मिरवणुक सकाळी ९ वाजता पासून सुरु झाली. शहरातील मोठा मारोती, गांधी चौक येथून मिरवणुक मार्गस्थ झाली. ट्रॅक्टरवर सजवलेल्या गणपती मंडळांच्या मुर्त्या आकर्षक सजवण्यात आल्या होत्या. ढोलताश्याच्या निनादात, गुलालांची उधळण करत, म्युझीक बॅन्ड पार्टीच्या सहवासात बाप्पांची मिरवणुक उत्साहात निघाली होती. काही भाविकांनी केळी येथील धरणात तर काहींनी काटेपूर्णा, चाकातिर्थ येथे गणेश विसर्जन केले.

Web Title: Sentimental messages to the wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.