अडीचशे रुपयांची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST2021-03-10T04:41:20+5:302021-03-10T04:41:20+5:30
देशभरात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनाकडून व्यापक उपाय योजना राबविण्यात येत असतानाच आता कोरोना प्रतिबंधक लसही दिली ...

अडीचशे रुपयांची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक उदासीन
देशभरात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनाकडून व्यापक उपाय योजना राबविण्यात येत असतानाच आता कोरोना प्रतिबंधक लसही दिली जात आहे. त्यात पहिल्या आणि दुसºया टप्प्यात कोरोना नियंत्रणात सक्रीय सहभाग घेणाºया शासकीय कर्मचाºयांसह इतर कर्मचाºयांना १६ फेबु्रवारीपासून लस देण्यात सुरुवात करण्यात आली, तर १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या दूर्धर आजारग्रस्त नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. शासकीय रुग्णालयांत ही लस मोफ त दिली जात असून, शासकीय रुग्णालयात अडीचशे रुपये खर्च करून ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात १ मार्चपासून एकूण ४०७० लोकांना ही लस देण्यात आली. त्यात ३३५१ ज्येष्ठ नागरिक, तर ७१९ दूर्धर आजारग्रस्तांचा समावेश आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणी करण्यासाठी शासनाने को-विन २ हे मोबाईल अॅप विकसीत केले आहे. तथापि, खासगी रुग्णालयांत नोंदणीसाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र असून, २ मार्चपासून ८ मार्चपर्यंत केवळ ७०२ नागरिकांनी खासगी रुग्णालयांत ही लस घेतली.
---------
लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक पुढे
जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांत मिळून एकूण ४०७० ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील दूर्धर आजारग्रस्तांनी ८ मार्चपर्यंत लस घेतली. त्यात ३३५१ ज्येष्ठ नागरिक, तर केवळ ७१९ दूर्धर आजारग्रस्त व्यक्तींचा समावेश होता. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे.
-----------------
महिलांचे प्रमाण ४० टक्के
शासनाने ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि दूर्धर आजार ग्रस्त व्यक्तींसाठी १ मार्चपासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांत मिळून ४०७० लोकांनी ही लस घेतली. त्यात २४७२ पुरुष आणि १५९८ महिला आहेत. अर्थात या लसीकरण मोहिमेंतर्गत लस घेणाºया महिलांचे प्रमाण ४० टक्के असल्याचे स्पष्ट होते.
----------------
कोट: शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी ज्येष्ठ नागरिकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली. ही बाब समाधानकारक आहे. यामुळे कोरोना संसर्गाची भिती नष्ट होणार असल्याने आपण ही लस घेतली. इतरांनीही ही लस अवश्य घ्यावी.
-मुकूंदराव वलसे (८२)
ज्येष्ठ नागरिक,
---------
कोट: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाचे उपक्रम चांगले आहेत. आता ज्येष्ठांना शासकीय रुग्णालयांत मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली आहे. आपण ही लस घेतली आहे. इतरांनीही ही लस घेऊन कोरोना नियंत्रणासाठी शासनाला सहकार्य करावे.
-राजपाल राठोड
ज्येष्ठ नागरिक (७२)
४०७०
जणांनी घेतली आतापर्यंत लस
------
शासकीय रुग्णालयात
३३६८
--------
खासगी रुग्णालयात
७०२
-------------
ज्येष्ठ नागरिक
३३५१
-------------
इतर
७१९
-----