पपईची मातीमोल भावात विक्री

By Admin | Updated: March 20, 2015 00:56 IST2015-03-20T00:56:57+5:302015-03-20T00:56:57+5:30

३ रूपये किलोनेही ग्राहक येईना; मंगरूळपीर तालुक्यातील फळउत्पादक शेतकरी त्रस्त.

Selling papaya Matimol | पपईची मातीमोल भावात विक्री

पपईची मातीमोल भावात विक्री

मंगरूळपीर (जि. वाशिम): उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे व नुकत्याच झालेल्या गारपीटमुळे पपईचे दर १२ रूपयावरून प्रति किलो ३ रूपये पर्यंंत आल्याने तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पपई लागवडीसाठी जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका आघाडीवर आहे.या तालुक्यातील शेतकर्‍यांनी अनेक प्रकारचे प्रयोग आपल्या शेतात करून यशस्वी झाले आहे. परंतु मागील एक दोन वर्षांंपासुन निर्सगाच्या अवकृपेमुळे फळ उत्पादक बळीराजा अस्मानी संकटात सापडुन कर्जबजारी होत आहे. तालुक्यात जवळपास सर्वच प्रकारच्या फळबागा आहेत.उन्हाळय़ात फळबागाचा फायदा होईल या आशेने पपई, खरबुज, टरबुज लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना वादळी पाऊस व गारपीटचा जबर फटका बसला आहे. शिवाय पंधरा दिवसांपासुन बदलेल्या वातावरणामुळे फळाची मागणी कमी झाली व्यापारी सुध्दा दिसेनासे झाले आहेत त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत. अचानक उत्तर भारतात गारवा निर्माण झाल्याने उन्हाळी फळांची मागणीत घट झाली असल्याने पपईच्या बागेत फळे पिकुन खाली पडत आहे. परिणामी शेतकर्‍यांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. निर्सगाच्या मार्‍याला हैराण झालेल्या बळीराजाना आधार देण्यासाठी शासनाने पुढे यावे अशी मागणी फळ उत्पादक शेतकरी करित आहे.

Web Title: Selling papaya Matimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.