बचत गटाच्या महिला आता खेळणार ज्यूडो कराटे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:47+5:302021-09-24T04:48:47+5:30

वाशिम : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळ व ट्रेडिशनल ॲण्ड स्पोर्ट्स शोतोकॉन कराटे-डू इंडिया यांच्या ...

Self-help group women to play judo karate now! | बचत गटाच्या महिला आता खेळणार ज्यूडो कराटे !

बचत गटाच्या महिला आता खेळणार ज्यूडो कराटे !

वाशिम : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळ व ट्रेडिशनल ॲण्ड स्पोर्ट्स शोतोकॉन कराटे-डू इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील लोकसंचालित साधन केंद्रात २३ सप्टेंबर रोजी तेजस्विनी आर्मी (सेल्फ डिफेन्स) कराटे प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले. या योगे बचत गटातील महिलांना आता आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच ‘ज्यूडो कराटे’चे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यावर भर दिला जाणार आहे.

तेजस्विनी आर्मी प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास तहसीलदार धीरज मांजरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहायक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव, प्रांजली वसाके, छाया मोटघरे, सुधाकर दामगीर, अजित घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार मांजरे म्हणाले, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी माविमने पुढाकार घेतला असून ही कौतुकास्पद बाब आहे, असे त्यांनी सांगितले.

................

कोट :

महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी बचत गट संकल्पनेवर आधारित कार्यनीतीचा अवलंब करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक व स्वसंरक्षण यादृष्टीने आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘तेजस्विनी आर्मी’ उपक्रमाच्या माध्यमातून जुडो कराटे आणि स्वरक्षणविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

- राजेश नागपुरे, जिल्हा समन्वयक, माविम, वाशिम

Web Title: Self-help group women to play judo karate now!