बालवैज्ञानिक मेळाव्यासाठी वढवीच्या शाळेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:17+5:302021-04-05T04:37:17+5:30
जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर विज्ञान प्रयोग यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रदर्शनीत संधी मिळत असते. गेल्यावर्षी राज्यस्तरीय इन्स्पायर अवाॅर्ड ...

बालवैज्ञानिक मेळाव्यासाठी वढवीच्या शाळेची निवड
जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर विज्ञान प्रयोग यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रदर्शनीत संधी मिळत असते. गेल्यावर्षी राज्यस्तरीय इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शनी अमरावती येथे पार पडली होती. यावर्षी मात्र २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन ऑनलाइन पद्धतीने भरविले जाणार आहे. यात सर्व राज्यांतील जवळपास ६०० विद्यार्थी एकाच वेळी सहभागी होणार आहेत.
......................
बाॅक्स
राष्ट्रीय प्रदर्शनीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगाची माहिती, त्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे मानक काॅम्पिटीशन ॲपवर अपलोड करावी लागतात. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातून वढवी येथील अप्पास्वामी विद्यालयाचा अंकुश भागवत (इयत्ता १० वी) हा विद्यार्थी जीव संरक्षण यंत्राच्या प्रयोगासह ऑनलाइन प्रदर्शनीत सहभागी होणार आहे.
...............
कोट :
जिल्ह्यातील एकमेव माॅडेलसाठी कारंजा तालुक्यातील अप्पास्वामी विद्यालय, वढवी येथील शाळेची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून सदर शाळा राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोविडमुळे सदर स्पर्धा ही या महिन्याच्या शेवटी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
- रमेश तांगडे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वाशिम