वाशिम जिल्ह्यात सिकलसेल सप्ताहानिमित्त तपासणी
By Admin | Updated: December 9, 2014 23:20 IST2014-12-09T23:20:44+5:302014-12-09T23:20:44+5:30
लाभ घेण्याचे सिकलसेल समन्वयक यांचे आवाहन

वाशिम जिल्ह्यात सिकलसेल सप्ताहानिमित्त तपासणी
वाशिम : जिल्हयात ११ डिसेंबरपासून सिकलसेल सप्ताह राबविण्यात येत असून सिकलसेलची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर सप्ताह १७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सिकलसेल आजार हा शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन गोल असणार्या लाल रक्तपेशी विळयाच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी १२0 दिवसपर्यंत जिवंत राहतात. परंतु सिकलसेल रोगग्रस्तांच्या ३0 ते ४0 दिवस पेशी जिवंत असतात हा आजार अनुवंशिक आहे यासंदर्भात मार्गदर्शन या सप्ताहानिमित्त करण्यात येणार आहे. यासह सिकलसेल आजाराचे प्रकार, आजाराची लक्षणे व त्यावर उपचार, सिकलसेल रूग्णांची काळजी कशी घ्यायची यावर या सप्ताहानिमित्त तज्ञांतर्फे मार्गदर्शन केल्या जाणार आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम जिल्हयात २0११ पासून राबविण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात सिकलसेल रूग्णांसाठी डे केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. सिकलसेल नियंत्रणाचे कामात मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बयस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेहकरकर, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सिरसुलवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. ससे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. जिल्हा सिकलसेल समन्वयक मनिषा अतकरे व जिल्हा सिकलसेल सहायक हे जिल्हयामध्ये चोखपणे कार्य बजावत आहेत. तरी सिकलसेल सप्ताहानिमित्त तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा सिकलसेल समन्वयक मनिषा अतकरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतिने करण्यात आले आहे.