१०० टक्के अनुदानावर मिळणार बियाणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:14+5:302021-02-14T04:38:14+5:30
जिल्ह्यात ५८ पशुवैद्यकीय दवाखाने असून, एकूण तीन लाख ५३ हजार ९२८ पशुधन आहे. यामध्ये गायवर्गीय १.६७ लाख व म्हैसवर्गीय ...

१०० टक्के अनुदानावर मिळणार बियाणे !
जिल्ह्यात ५८ पशुवैद्यकीय दवाखाने असून, एकूण तीन लाख ५३ हजार ९२८ पशुधन आहे. यामध्ये गायवर्गीय १.६७ लाख व म्हैसवर्गीय ५३ हजार पशुधनाचा समावेश आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. चाराटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण योजना) अंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप करणे या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी १ हजार ५०० रुपये मर्यादेत वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी एक लाख रुपयांचा निधी उपलब्ध असून, जिल्हा वार्षिक योजनेमधून १० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे नोंदविण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीस्तरावर योजनेचे अर्ज स्वीकारले जात आहेत. या योजनेचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती डॉ. श्याम गाभणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी केले.
0000000000
वैरण बियाण्यासाठी उपलब्ध निधी - १ लाख
जिल्हा नियोजन समितीकडे मागणी नोंदविली - १० लाख
००००
बॉक्स
असे आहे पशुधन
गायवर्गीय - १,६७,०७६
म्हैसवर्गीय -५३,३०४
0000000000