तपासणीसाठी खतांसह बियाणांचे नमुने घेतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:09+5:302021-05-31T04:29:09+5:30

वाशिम : कृषी निविष्ठासंदर्भात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हास्तरीय भरारी पथकाने २९ मे रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरातील ...

Seed samples taken with fertilizers for inspection! | तपासणीसाठी खतांसह बियाणांचे नमुने घेतले !

तपासणीसाठी खतांसह बियाणांचे नमुने घेतले !

वाशिम : कृषी निविष्ठासंदर्भात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हास्तरीय भरारी पथकाने २९ मे रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून रासायनिक खते व बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान, शासकीय दरानुसारच बियाणे, खतांची विक्री करण्याच्या सूचना कृषी सेवा केंद्र संचालकांना देण्यात आल्या.

केंद्र सरकारने अनुदानात वाढ केल्याने डीएपीसह अन्य कंपनीच्या काही खतांच्या किमती कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दरानुसार रासायनिक खतांची विक्री शेतकऱ्यांना होत आहे की नाही याची पडताळणी म्हणून कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांनी २९ मे रोजी अनसिंग येथे कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. जादा दराने खते विक्री करण्यात येऊ नये, रास्त दरात विक्री करण्यात यावे, पॉस मशीनद्वारेच खताची विक्री करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. कृषी सेवा केंद्रांची तपासणीदरम्यान रासायनिक खतांचे नमुने व बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक भद्रोड यांनी दिली. अहवाल प्राप्त होताच दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, विक्रेत्याने जादा दराने खते विक्री केल्यास कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी विकास अधिकारी विकास बंडगर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिला.

Web Title: Seed samples taken with fertilizers for inspection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.