जिल्ह्यातील सुरक्षा रामभराेसे; ६८० लाेकांमागे केवळ एक पाेलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:40+5:302021-02-05T09:27:40+5:30

राज्यात दाेन टप्प्यात माेठ्या प्रमाणात पाेलिसांची भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाेलिसांची संख्या पाहता माेठ्या प्रमाणात पाेलिसांची आवश्यकता आहे. ...

Security in the district; Only one paelis out of 680 lakhs | जिल्ह्यातील सुरक्षा रामभराेसे; ६८० लाेकांमागे केवळ एक पाेलीस

जिल्ह्यातील सुरक्षा रामभराेसे; ६८० लाेकांमागे केवळ एक पाेलीस

राज्यात दाेन टप्प्यात माेठ्या प्रमाणात पाेलिसांची भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाेलिसांची संख्या पाहता माेठ्या प्रमाणात पाेलिसांची आवश्यकता आहे. पाेलिसांची संख्या कमी असल्याने पाेलिसांवर चांगलाच ताण वाढला असून सुट्ट्या न मिळणे, कामाचा बाेजा यामुळे पाेलीस कर्मचारी वैतागले आहेत. एखादी घटना घडल्यास परजिल्ह्यातून पाेलीस कुमक बाेलावण्याची पाळी वाशिम जिल्हा पाेलीस विभागाला करावी लागत आहे. या भरतीमुळे पाेलिसांचा ताण कमी हाेण्याची शक्यता दिसून येत आहे.

....................

जिल्ह्यात गुन्हेगारी कमी प्रमाणात

नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्युराेच्या अहवालानुसार मेट्राे सिटीचा समावेश दिसून येताे. गुन्ह्यांमध्ये वाशिम जिल्हा खूप मागे असल्याची माहिती पाेलीस विभागाकडून देण्यात आली आहे. माेठ्या स्वरूपाचे गुन्ह्याचे प्रमाण जिल्ह्यात अत्यल्प आहेत. चाेऱ्या, वाटमाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात दिसून येत असले तरी खून, दराेडा असे प्रकार अत्यल्प असल्याची माहिती पाेलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

................

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुट्टीही मिळेना

जिल्ह्याच्या लाेकसंख्येच्या तुलनेत ६८० नागरिकांमागे एक पाेलीस कर्मचारी अशी स्थिती आहे. काही दंगल, अनुचित घटना घडल्यास सुट्टीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्याची वेळ येत आहे. सद्यस्थितीत पाेलीस कर्मचाऱ्यांवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला असून सुट्टी घेणे तर दूर अतिरिक्त काम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आलेली दिसून येत असल्याचे पाेलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता दिसून आले.

.............

जिल्ह्यात पाेलिसांची संख्या कमी आहे. गृहमंत्र्यांनी पाेलिसांची भरती करण्याचे म्हटले आहे. याचा जिल्ह्याला नक्कीच फायदा हाेईल. कमी कर्मचाऱ्यांमध्येसुध्दा जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पाेलीस कर्मचारी झटत आहेत.

- वसंत परदेसी, पाेलीस अधीक्षक, वाशिम

.................

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १०२५६८०

जिल्ह्यातील पोलीस संख्या १५००

Web Title: Security in the district; Only one paelis out of 680 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.