‘मिशन इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:08 PM2020-01-06T14:08:42+5:302020-01-06T14:08:47+5:30

यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे.

The second phase of the 'Mission Rainbow' from today! | ‘मिशन इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा!

‘मिशन इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गर्भवती महिला व बालकांना जडणाऱ्या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळवून माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात २ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे. या मोहिमेच्या दुसºया टप्प्यातील कार्यास सोमवार, ६ जानेवारीपासून सुरूवात होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली.
क्षयरोग, कावीळ, पोलीओ, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला यासह अन्य आजारांसाठी लसीकरण केल्याने गरोदर माता व बालकांना सुरक्षितता येते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जोखीमग्रस्त भागातील शून्य ते दोन वर्षे वयोगटातील जी बालके आणि गरोदर माता सर्वेक्षणानुसार लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ हे २ डिसेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले, की युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने २ डिसेंबर २०१९, ६ जानेवारी २०२०, ३ फेब्रुवारी २०२० आणि २ मार्च २०२० अशा चार टप्प्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहिम राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात, २ डिसेंबरपासून १६२ आरोग्य सेवा सत्राव्दारे जोखीमग्रस्त भागातील सर्वेक्षणानुसार गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील १६७ आणि शहरी भागातील ७० अशा एकूण २३७ गरोदर महिला आणि शून्य ते २ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ९०० आणि शहरी भागातील ५६० अशा एकूण १४६० बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले.


जिल्ह्यात चार टप्प्यात मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २ डिसेंबरपासून राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात ठराविक उद्दीष्टाच्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींचे लसीकरण ६ जानेवारीपासून दुसºया टप्प्यात केले जाणार आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

Web Title: The second phase of the 'Mission Rainbow' from today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम