आसन क्षमतेचा अभ्यासिका संचालकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:17+5:302021-03-06T04:39:17+5:30

जिल्हाधिकारी यांनी ३ मार्च राेजी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या २५ टक्के आसन क्षमतेने सुरू करण्यास मुभा ...

Seat capacity study hits director | आसन क्षमतेचा अभ्यासिका संचालकांना फटका

आसन क्षमतेचा अभ्यासिका संचालकांना फटका

Next

जिल्हाधिकारी यांनी ३ मार्च राेजी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या २५ टक्के आसन क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी आसन क्षमता जास्त असल्याचे अभ्यासिका संचालकांचे म्हणणे आहे, तसेच अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अभ्यासिकेत प्रवेश देऊ नये, या अटीमुळे विद्यार्थी अभ्यासिकेकडे फिरकत नसल्याचे वास्तव्य आहे. वाशिम शहरात असलेल्या अभ्यासिकेमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून, ‘लाेकमत’च्या वतीने याची पाहणी केली असता, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर हाेत असल्याचे दिसून आले.

...................

अभ्यासिकेत काेराेना नियमांचे पालन

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये शहरातील अभ्यासिका संचालकांकडून तंताेतत पालन केल्या जात असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. अभ्यासिकेच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करून, सॅनिटायझर देऊन प्रवेश दिला जात आहे, तसेच विनामास्क काेणालाही प्रवेश दिल्या जात नसल्याचे दिसून आले. एका बाकावर एक विद्यार्थी बसवून काेराेना नियमांचे पालन हाेत असल्याचे ‘लाेकमत’ने ५ मार्च राेजी केलेल्या पाहणीवरून दिसून आले.

.............

काेराेना चाचणीऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासणी करणे अनिवार्य ठेवावे, तसेच २५ टक्के आसन क्षमता अतिशय कमी आहे. यामुळे यामध्ये वाढविणे गरजेचे आहे.

- रामेश्वर इंगळे, अभ्यासिका, संचालक

Web Title: Seat capacity study hits director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.