शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाच्या तीन कट्ट्यावर आढळला ‘सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड’चा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 18:36 IST

२६ जुलै रोजी पुरवठा व पोलीस विभागाने संयुक्तरित्या तांदळाची तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : एसटी महामंडळाच्या मालवाहू बसमधून वाहतूक होत असलेला तांदूळ कारंजा शहर पोलिसांनी २५ जुलै रोजी कोळी फाट्याजवळ पकडल्यानंतर, २६ जुलै रोजी पुरवठा व पोलीस विभागाने संयुक्तरित्या तांदळाची तपासणी केली. यावेळी तीन कट्टयावर मध्यप्रदेश, स्टेट सिव्हील, सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड आर. एम. एस. २०१९-२० व्हिट असा शिक्का असल्याचे आढळून आले.शेलुबाजार येथून कारंजा मार्गे तुमसर, भंडाराकडे जाणाºया महामंडळाच्या मालवाहू बसमध्ये सरकारी तांदूळ नेत नसल्याची गुप्त माहिती ठाणेदार सतिष पाटील यांना मिळाली होती. यावरून नाकाबंदी करीत कोळी गावाजवळ शेलुबाजार मार्गे येत असताना एम.एच.१४  बी.टी.०८५६ क्रमांकाची बस थांबवून चौकशीसाठी कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर तहसिलदारांशी पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, २६ जुलै रोजी पुरवठा विभाग आणि पोलीस पथकाने मालवाहू बसमधील तांदळाची तपासणी केली. यावेळी तांदळाचे एकूण २०० कट्टे आढळले असून, यापैकी तीन कट्ट्यावर मध्यप्रदेश, स्टेट सिव्हील, सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड आर.एम.एस २०१९-२० व्हिट असा शिक्का आढळून आला. कारंजा तहसिलदार धीरज मांजरे यांनी सखोल तपासासाठी कारंजा पोलिसांना पत्र दिले असून पोलीस तपासात काय निष्पन्न होते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. तपासादरम्यान तांदळाचे कट्टे व मालवाहतूक करणारी बस पोलिसांच्या ताब्यात राहिल, असे ठाणेदार पाटील यांनी सांगितले. यापूर्वीही मंगरूळपीर येथे दोनदा व कारंजा येथे एकदा तांदळाचा ट्रक पोलिसांनी पकडला होता.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा