‘श्रीं’च्या मूर्तींच्या बुकिंगसाठी मूर्तिकार ग्राहकांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:42+5:302021-08-26T04:43:42+5:30
वाशिम : काेराेनामुळे गतवर्षी सार्वजनिक श्रींच्या मूर्तीची स्थापना हाेऊ शकली नाही. याही वर्षी मूर्तिकारांनी माेठ्या प्रमाणात मू्र्ती बनवून ठेवल्या ...

‘श्रीं’च्या मूर्तींच्या बुकिंगसाठी मूर्तिकार ग्राहकांच्या प्रतीक्षेत
वाशिम : काेराेनामुळे गतवर्षी सार्वजनिक श्रींच्या मूर्तीची स्थापना हाेऊ शकली नाही. याही वर्षी मूर्तिकारांनी माेठ्या प्रमाणात मू्र्ती बनवून ठेवल्या असल्या तरी एकाही मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुकिंग न केल्याने मूर्तिकार ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत. तसेच दरवर्षी मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातून अनेक मूर्तिकारांच्या मूर्ती बाजारात काही व्यावसायिक विक्रीस आणायच्या, परंतु गतवर्षीच्या पडून असलेल्या मूर्ती पाहता एकाही जणाने परजिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मूर्ती आणल्या नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे गतवर्षीपासून गणेशोत्सव पाहिजे त्या प्रमाणात साजरा होत नाही. गणपती मूर्तीच्या उंचीबाबत निर्बंध येत असल्याने मोठ्या मूर्ती बनविणे जवळपास बंद झाले आहे. काही मूर्तिकारांनी बनवून ठेवलेल्या माेठ्या मूर्ती पडून आहेत. वाशिम येथे मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांतील मूर्तींना मागणी होती, ती आता खूप अल्प प्रमाणात आहे. तसेच गणेशोत्सव मंडळे मूर्ती बसविण्याबाबत संभ्रमात असल्याने गणेशोत्सव मंडळांनीसुद्धा गणपतीची मूर्ती बुकिंग थांबवली आहे.
पहिलेच संकटात असलेला मूर्तिकार कुंभार बांधव आता आणखीनच संकटात सापडला असून आपला उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत दिसून येत आहे. गतवर्षी चार फुटांपेक्षा उंचीच्या मूर्ती बनवून शासनाने विक्रीस परवानगी नाकारल्याने मोठ्या मूर्ती तशाच बनवून घरी राहिल्याने कुंभार समाज आर्थिक संकटात सापडला व या वर्षी चार फुटांपर्यंत मूर्ती बनवून तयार असून ही गणेशोत्सव मंडळाची मागणी नसल्याने मूर्तिकार कुंभार बांधव खचला आहे. आता उदरनिर्वाह कसा भागेल व उदरनिर्वासाठी शासन काही मदत करेल काय, याच आशेवर मूर्तिकार बांधव आहे.