वाशिम जिल्हय़ात भंगार बसगाड्यांची भरमार
By Admin | Updated: December 11, 2014 00:10 IST2014-12-11T00:10:44+5:302014-12-11T00:10:44+5:30
बसफे-या अनियमित : महामंडळ सुस्त, प्रवासी त्रस्त.

वाशिम जिल्हय़ात भंगार बसगाड्यांची भरमार
कारंजा लाड (वाशिम) : जिल्हय़ात भंगार बसेसची भरमार झाली असून, कोणती बस कधी व कोठे बंद पडेल, याचा नेमच नाही. भंगार बसेसमुळे एसटी महामंडळाच्या नियमित प्रवाशांना मोठा मनस्ताप: सहन करावा लागत असताना राज्य परिव्हन महामंडळाचे मात्र याकडे थोडेही लक्ष नसल्याचे दिसत आहे. भंगार बसेससह अपुर्या कर्मचार्यांमुळे कित्येक बसगाड्या वेळेवर चालत नसल्याने प्रवासी वैतागले आहेत.
जिल्हय़ातील कारंजा आगारात एकूण ४३ बसेस आहेत. त्यापैकी १२ बसेस लांब पल्ल्याच्या असून, त्यांची स्थिती बर्यापैकी आहेत. आगारात सर्व बसेसची रोजच नियमित तपासणी होत असते. या आगाराला यंदा गत महिन्यात एक आणि गत वर्षी सहा नव्या बसेस मिळाल्या होत्या. म्हणजे आगारात अतिशय चांगल्या स्थितीत असलेल्या सात बसेस असल्याचे दिसते. रिसोड आगारात एकूण ४५ बसेस असून, या ठिकाणी दरररोज दोन वेळांत अनुक्र मे १२ आणि ११ अशा एकूण २३ बसेसचे काम होते. या आगाराला अनेक दिवसांपासून नवी बस मिळाली नाही. वाशिम आगारामध्ये एकूण ५0 बसेस आहेत. यावर्षी वाशिम आगाराला केवळ एक नवी बस मिळाली. या ठिकाणी रोज दोन वेळांत मिळून १७ ते १८ बसेसची दुरुस्ती करण्याचे काम केले जाते. मंगरुळपीर आगारात एकूण ३९ बसेस असून, त्यापैकी चार बसेस नादुरुस्त असल्याचे कळले. जिल्हय़ात मंगरुळपीर, कारंजा, वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा असे सात तालुके असले तरी त्यापैकी मानोरा आणि मालेगाव येथे आगार नाही.