जिल्ह्यात शाळा सुरू मात्र एसटी बंद ; विद्यार्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:38+5:302021-02-05T09:27:38+5:30
काेराेनापूर्वी जिल्ह्यात असलेल्या चार आगारांतून एकूण १७५ बसेस धावत हाेत्या. सद्य:स्थितीत १३५ बसफेऱ्या धावत आहेत. अद्याप जिल्ह्यातील २७ बसेस ...

जिल्ह्यात शाळा सुरू मात्र एसटी बंद ; विद्यार्यांचे नुकसान
काेराेनापूर्वी जिल्ह्यात असलेल्या चार आगारांतून एकूण १७५ बसेस धावत हाेत्या. सद्य:स्थितीत १३५ बसफेऱ्या धावत आहेत. अद्याप जिल्ह्यातील २७ बसेस बंद असल्याने या बसच्या भरवशावर असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पालकांकडे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था आहे, ते त्यांना शाळेत पाठवित आहेत, परंतु ज्यांच्याकडे व्यवस्थाच नाही त्यांचे मात्र नुकसान हाेत आहे. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सर्वाधिक १० बसफेऱ्या बंद असून त्यापाठाेपाठ वाशिम तालुक्यातील ८ बसफेऱ्या बंद आहेत.
.......................
जिल्ह्यात या मार्गावर एसटीची एकही फेरी नाही
लाॅकडाऊनपूर्वी १७५ बसफेऱ्या सुरू हाेत्या. सध्या १६० बसेस सुरु आहेत. यामध्ये रिसाेड तालुक्यातील शेलु खु., नावली-मालेगाव, हराळ-गाेरेगाव या रस्त्यावर एकही बस सुरू दिसून येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे.
...............
कोरोनाआधी किती बसेस धावत होत्या?
जिल्ह्यात काेराेनाआधी एकूण १७५ बसेस धावत हाेत्या. काेराेनानंतर १३५ बस सुरू करण्यात आल्या हाेत्या. मानव विकास मिशनच्या वाशिम आगारात १४, कारंजा तालुक्यात ६, मंगरुळपीर तालुक्यात १, रिसाेड तालुक्यातील ७ बसेसचा समावेश आहे. यामधील मंगरुळपीर तालुक्यातील मानव विकास मिशनच्या पूर्ण तर इतरही तालुक्यातील बसेस अद्याप सुरू नाहीत. जिल्ह्यात एकूण बसेस १६० सुरू आहेत.
..............
काही गावांतील रस्त्यांचे काम सुरू असल्याने बसफेऱ्या बंद आहेत. तर काही गावांमधून प्रवासीसंख्याच नसल्याने बसफेरी बंद आहे. हळूहळू सर्व ठिकाणच्या बसेस सुरु करण्यात येणार आहेत. विद्यार्थी असलेल्या बहुतांश गावांतील बसफेऱ्या बंद नाहीत.
डी.एम. इलामे, आगारप्रमुख,
..............
विद्यार्थी म्हणतात.....
गावातील बसच सुरु नसल्याने शाळेत जाताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. पालकांना एखादे महत्त्वाचे काम निघाल्यास शाळेत जाता येत नाही.
- अक्सानाज नुसाखान
विद्यार्थिनी, आसेगाव, ता. मंगरुळपीर
..............
मानाेरा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात, मात्र बसेस सुरु नसल्याने शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
- नंदकिशाेर रामभाऊ देशमुख
विद्यार्थी, कारखेडा, ता. मानाेरा