जिल्ह्यातील शाळा सुरू ; महाविद्यालये मात्र बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:44+5:302021-02-05T09:28:44+5:30

सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षणक्षेत्रही सुटू शकले ...

Schools in the district continue; Colleges only closed! | जिल्ह्यातील शाळा सुरू ; महाविद्यालये मात्र बंदच!

जिल्ह्यातील शाळा सुरू ; महाविद्यालये मात्र बंदच!

सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षणक्षेत्रही सुटू शकले नाही. नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वाजली. त्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. दुसरीकडे, महाविद्यालये अद्याप सुरू झाले नाहीत. इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, असे असतानाही नेमकी महाविद्यालयेच बंद का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००००

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

कोरोनामुळे गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. आनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे मिळत असले तरी विज्ञान व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. विद्यार्थी हे महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महाविद्यालय बंद असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

०००

गेल्या १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे महाविद्यालये सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालये सुरू केव्हा होणार याकडे लक्ष लागून आहे.

-सुरज सरकटे, विद्यार्थी वाशिम

००

पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत समजदारपणा अधिक असतो. त्यामुळे ते कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करू शकतात. महाविद्यालये सुरू होणे अपेक्षित आहे.

-स्वप्निल खंडारे, विद्यार्थी वाशिम

००

महाविद्यालये बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये सुरू होणे अपेक्षित आहे. कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या अटीवर महाविद्यालये सुरू झाली तर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

-नीलेश शर्मा, विद्यार्थी रिसोड

००

महाविद्यालये सुरू होणे अपेक्षित असताना, इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यामुळे महाविद्यालये सुरू करून शासनाने विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. आनलाईन पद्धतीने सध्या शिक्षणाचे धडे मिळत आहेत.

- प्रतीक काबरा, विद्यार्थी, रिसोड

०००

Web Title: Schools in the district continue; Colleges only closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.