शालेय पोषण आहारात अपहार!

By Admin | Updated: June 3, 2017 01:55 IST2017-06-03T01:55:29+5:302017-06-03T01:55:29+5:30

जिल्हा परिषद शाळा वाकद : चौकशी करण्याची मागणी

School nutrition impairment! | शालेय पोषण आहारात अपहार!

शालेय पोषण आहारात अपहार!

लोेकमत न्यूज नेटवर्क
वाकद : येथील जि.प.मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला, तसेच लग्नासाठी नियमबाह्य पद्धतीने शाळा देऊन त्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गजानन घोडके तथा इतर सदस्यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे, की येथील शाळेत १.५.२०१२ चा वादग्रस्त तांदूळ ४४ कट्टे (२२ क्ंिवटल ) जमा होता. यात सदर तांदूळ अध्यक्ष विष्णू मापारी व मुख्याध्यापक सुधीर सरकटे यांनी सदस्यांना माहीत न करता परस्पर तांदळाची विक्री केली. शिवाय, शाळा सुरू असताना लोकांना लग्नासाठी शाळा दिली. त्याचे भाडे प्रत्येकी तीन हजार रुपये आकारले जाते. मात्र, ६ ते ७ लग्नाचे पैसे परस्पर हडप केले असून, शालेय पोषण आहारामध्येही खूप मोठा भ्रष्टाचार असून, याची सखोल चौकशी केल्यावर सत्य बाहेर येणारच आहे. त्याचप्रमाणे शाळा देखभाल दुरुस्तीचे १५००० व शाळा अनुदान १०००० या रकमेचाही समितीसदस्यांना थांगपता लागू न देता अपहार केला व मूळ प्रोसिडिंग रजिस्टरवर खोट्या सह्या केल्या. शालेय पोषण आहाराचा कुंभार समितीचे अध्यक्ष विष्णू मापारी यांच्याकडे घेतला व त्यांचे नावाने धनादेश काढले. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी गजानन घोडकेसह मनीष ढोले, ज्ञानेश्वर बोरकर, भास्कर कव्हरे, शोभा रामदास पोपळकर, मीना अमोल खनपटे, गजानन दत्ता तिटके, यांनी केले आहे व त्यांचा प्रतिलिपी जिल्हाधिकारी वाशिम शिक्षण सभापती वाशिम, गटविकास अधिकारी रिसोड सभापती पं.स. रिसोड, आयुक्त अमरावती यांच्याकडे दिल्या आहेत.

Web Title: School nutrition impairment!