शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्थानिक प्रशासनाची संमती असेल तरच शाळेची घंटा वाजणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 3:57 PM

नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात किती स्थानिक प्रशासनाची संमती आहे याचा आढावा शिक्षणाधिकाºयांमार्फत घेतला जात आहे.

- संतोष वानखडेवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय कुठेही शाळा सुरू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने सर्व शिक्षणाधिकाºयांना २४ जूनला दिल्या. या सुचनांच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाची शाळा सुरू करण्यास संमती आहे की नाही यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे आता आढावा घेतला जात आहे.राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विपरित परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थिती शाळा सुरू कराव्या की नाही यावर विचारमंथन सुरू आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात कोणते वर्ग केव्हापासून सुरू करावे यासंदर्भात राज्य शासनाने १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. परंतू, याबाबत अधिक स्पष्टता नसल्याने काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने २४ जून रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाºयांना, शाळा सुरू करण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक पातळीवर तेथे कोरोनाबाधित रुग्ण आहे का, शाळा क्वारंटीनसाठी प्रशासनाच्या ताब्यात आहे का तसेच स्थानिक प्रशासनाची शाळा सुरू करण्यासंदर्भात संमती आहे का या तीन प्रमुख मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत. स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाºयांनी शाळा सुरू करण्याबाबत, शिक्षक उपस्थितीत्बाबत कोणतेही निर्देश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाºयांना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी शाळा क्वारंटीनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असेल, त्या ठिकाणी शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येईपर्यंत कोणत्याही शिक्षकाला शाळेत बोलावू नये, असेही शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाºयांना बजावले. या अनुषंगाने नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात किती स्थानिक प्रशासनाची संमती आहे याचा आढावा शिक्षणाधिकाºयांमार्फत घेतला जात आहे. हा आढावा पूर्ण झाल्यनंतर नियोजित वेळापत्रकानुसार किती ठिकाणी शाळा सुरू होऊ शकतील, याची निश्चित माहिती शिक्षण विभागाला मिळणार आहे.

 शालेय शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार वाशिम जिल्ह्यात यासंदर्भात कार्यवाही केली जात आहे. स्थानिक प्रशासनाची संमती असेल तरच शाळा सुरू केल्या जातील. आॅनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा