शिष्यवृत्ती परीक्षेचे संकेतस्थळ अद्यापही ‘ऑफलाइन’

By Admin | Updated: October 19, 2014 00:34 IST2014-10-19T00:34:25+5:302014-10-19T00:34:25+5:30

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन संकेतस्थळ ऑफलाइनच असल्याने शाळांसह पालकही संभ्रमात.

The scholarship test website is still 'offline' | शिष्यवृत्ती परीक्षेचे संकेतस्थळ अद्यापही ‘ऑफलाइन’

शिष्यवृत्ती परीक्षेचे संकेतस्थळ अद्यापही ‘ऑफलाइन’

मालेगाव (वाशिम) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येत असते. विद्यार्थ्यांंकडून सर्व माहिती, शुल्क जमा झाले असून, अद्यापही ऑनलाइन संकेतस्थळ ऑफलाइनच असल्याने शाळांसह पालकही संभ्रमात आहेत. शिष्यवृत्ती २0१४ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या १६ ऑक्टोबर २0१४ च्या पत्रानुसार याबाबत सर्व सूचना दिल्या गेल्या असून, शाळांनी तो फॉर्म ऑनलाइन कसा भरावा, याबाब त माहिती दिली आहे. ही सर्व माहिती फॉर्म यावर्षी शाळांनीच भरावयाचा असून, त्यासाठी परीक्षा परिषदेकडून शाळेत लॉगइन, आयडी व पासवर्ड मिळणार आहे. शाळा संलग्नता शुल्क, परीक्षा शुल्क, आवेदनपत्र शुल्क, बँक शुल्क यांचे एकत्रित चलान शाळांना ऑनलाइन उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. सदर रक्कम शाळेने चलानाद्वारे बँकेत भरल्यानंतर ट्रान्झ्ॉक्शन आयडी नमूद करून चलान अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रपत्र अ ची पिंट्रआउट शाळेत ऑनलाइन उपलब्ध होईल. शाळेने प्रपत्र अ सोबत चलानाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्रे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा केल्यावरच आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. शुल्काची रक्कम १ डिसेंबर २0१४ अखेरपर्यंंत भरावी लागणार आहे. त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यास ५0 प्रमाणे विलंब शुल्क आकारले जाणार आहे. संके तस्थळ वाशिम जिल्ह्यात सुरू न झाल्याने सर्वांंचाच गोंधळ उडत आहे. ज्यावेळी संकेतस्थळ सुरू होईल, त्यावेळपासून विनाअडथळा ते सुरू राहावे, अशी शिक्षक वर्गाची अपेक्षा आहे.

Web Title: The scholarship test website is still 'offline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.