वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार
By Admin | Updated: June 17, 2017 00:56 IST2017-06-17T00:56:36+5:302017-06-17T00:56:36+5:30
मंगरूळपीरची घटना : शौचास बाहेर जाणे जीवावर बेतले!

वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : येथील बसस्थानक परिसरातील अशोकनगरमध्ये वास्तव्यास असलेला २२ वर्षीय युवक महामार्ग ओलांडून रात्री शौचास जात असताना त्यास अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १५ जून रोजी घडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिसांनी घटनेची नोंद केली.
अशोकनगर येथील शे.इमरान शे.शकील (वय २२) हा १५ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार पाउस सुरु असताना छत्री घेऊन बसस्थानक परिसरात शौचास जात होता. यावेळी रस्ता ओलांडताना त्याला भरधाव वाहनाने जबर धडक दिली. दरम्यान, जवळ उभ्या असलेल्या काही लोकांनी शे. इमरान यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. डॉ. श्रीकांत जाधव यांनी मंगरुळपीर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.