पाणीपुरवठा योजनेसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:32+5:302021-04-28T04:44:32+5:30

तक्रारीत नमूद केले आहे की, वापटा येथे पाणीपुरवठा योजनेकरिता उमरदरी येथे सर्व्हे नंबर ४/१ ब क्षेत्र १.११ पैकी ७ ...

Scam in land transactions purchased for water supply scheme | पाणीपुरवठा योजनेसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात घोटाळा

पाणीपुरवठा योजनेसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात घोटाळा

तक्रारीत नमूद केले आहे की, वापटा येथे पाणीपुरवठा योजनेकरिता उमरदरी येथे सर्व्हे नंबर ४/१ ब क्षेत्र १.११ पैकी ७ आर पोटखराब जमीन बेबीबाई बाबूसिंग राठोड यांच्याकडून खरेदी करण्यात आली. जमिनीचे मूल्यांकन ४ लाख ५१ हजार रुपये असून, त्याची किंमत प्रती गुंठा ११२७५ होते. दरम्यान, ७ आर जमिनीची परवानगी घेऊन जमीन खरेदी करण्यात आली; मात्र त्याचीच किंमत वाढविण्यात आली आहे. यामध्ये आठ लाख रुपयांचा गैरव्यवहार सरपंच व सचिव यांनी केला.

विशेष म्हणजे खरेदी पत्रावर शासकीय कामासाठी जमीन खरेदी करताना सरपंच शेषराव नारायण राठोड व सचिव ज्योती धनंजय काटोले यांचे नाव आहे. वैयक्तिक नाव टाकणारे दुय्यम निबंधक मानोरा हे सुद्धा यामुळे दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरपंच व सचिवावर फाैजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पृथ्वीराज राठोड यांनी केली.

.........................

कोट :

नवीन शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांसाठी जमीन खरेदी करीत असताना त्यावेळी सरपंच, सचिव कोण होते हे स्पष्ट होण्यासाठी सरकारी मालमत्ता खरेदीवर सरपंच, सचिवांची नावे नमूद केली जातात. पाणीपुरवठा योजनेसाठी जमिनीचा व्यवहार नेमका कसा झाला, यासंदर्भात आपणास माहिती नाही.

संजय भगत

विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती, मानोरा

.........................

कोट :

जागा खरेदी करताना तेथील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे आधार कार्ड खरेदी कागदपत्रांना जोडावे लागते. ग्रामपंचायतीला आधार कार्ड नाही म्हणून आम्ही जोडली, मग ती जागा आमची झाली का?तक्रारककर्ते यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. जमिनीची खरेदी नियमाने करण्यात आली असून, कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.

-ज्योती धनंजय काटोले

सचिव, ग्रामपंचायत वापटा

Web Title: Scam in land transactions purchased for water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.