हा माझा नाही म्हणत पित्यानेच ठेवला चिमुकल्याच्या मानेवर सुरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST2021-07-03T04:25:51+5:302021-07-03T04:25:51+5:30

शिरपूर जैनपासून १६ किलोमीटर अंतरावर रिसोड तालुक्यातील मसला पेन येथील संतोष लक्ष्मण श्रीनाथ आणि उमा संतोष श्रीनाथ या दाम्पत्याला ...

Saying this is not mine, my father put it on Chimukalya's neck! | हा माझा नाही म्हणत पित्यानेच ठेवला चिमुकल्याच्या मानेवर सुरा !

हा माझा नाही म्हणत पित्यानेच ठेवला चिमुकल्याच्या मानेवर सुरा !

शिरपूर जैनपासून १६ किलोमीटर अंतरावर रिसोड तालुक्यातील मसला पेन येथील संतोष लक्ष्मण श्रीनाथ आणि उमा संतोष श्रीनाथ या दाम्पत्याला चार महिन्याचा मुलगा आहे. चैतन्य नावाचा हा चार महिन्याचा मुलगा हा माझ्या पोटचा नसून, मी त्याला मारून टाकणार असे म्हणत संतोष श्रीनाथने २ जुलै रोजी आपल्याच मुलाच्या गळ्यावर लोखंडी सुरा ठेवत घरात त्याला घेऊन येरझारा घालण्यास सुरू केले. त्यावेळी त्याची पत्नी व बाळाची आई असलेली उमा श्रीनाथ हिने चार महिन्याचा चैतन्यला माथेफिरू बापाच्या तावडीतून सोडविले. त्यामुळे आरोपी संतोषने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिला जमिनीवर पाडत जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्यावरही लोखंडी सुरा उगारला, परंतु उमाने आरोपीचा हात धरला व आरडाओरड केली. यावेळी दौलत श्रीनाथ याने घटनास्थळी येऊन आरोपीच्या तावडीतून महिलेची सुटका केली. या प्रकरणी उमा श्रीनाथ हिच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जगदीश बांगर हे करीत आहेत.

Web Title: Saying this is not mine, my father put it on Chimukalya's neck!