सराईत गुन्हेगाराला अटक
By Admin | Updated: December 30, 2015 01:56 IST2015-12-30T01:56:08+5:302015-12-30T01:56:08+5:30
वाशिम पोलिसांची कारवाई.

सराईत गुन्हेगाराला अटक
वाशिम : शहरातील शांतता व सुव्यवस्थेला नेहमी छेद देणारा सराईत गुन्हेगार अब्दुल रज्जाक ऊर्फ लल्ला याच्याविरुद्ध सीआरपीसी १५१ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला वाशिम येथे २९ डिसेंबरला अटक करण्यात आली. आरोपी अब्दुल रज्जाक ऊर्फ लल्ला हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे गुन्हे करीत असल्याचा इतिहास आहे. शहरामध्ये अनेक गुन्हे घडले; परंतु पीडित इसमांनी किंवा महिलांनी आपल्या जीवाच्या भीतीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. आरोपी लल्ला याचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन त्याच्यावर वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेश मेघराजानी यांचे आदेशान्वये शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआरपीसी १५१ (१) (३) गुन्हा दाखल करण्यात आला. २९ डिसेंबरला त्याला शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठय़ा शिताफीने पकडले.