राधेश्यामच्या मदतीसाठी सरसावले सवंगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:37+5:302021-07-10T04:28:37+5:30
भर जहागीर येथील रहिवासी राधेश्याम सुरूशे हा घरात एकटाच कमावता युवक. कोरोनाकाळात त्याचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे रोजमजुरीची कामे ...

राधेश्यामच्या मदतीसाठी सरसावले सवंगडी
भर जहागीर येथील रहिवासी राधेश्याम सुरूशे हा घरात एकटाच कमावता युवक. कोरोनाकाळात त्याचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे रोजमजुरीची कामे करण्यासाठी तो दूरपर्यंत भटकंती करायचा. अशातच २८ जून रोजी कापशिंगी गावाकडे दुचाकीवर जात असताना कुत्रे आडवे येऊन अपघात घडला. या घटनेत राधेश्याम तीन तास जागीच बेशुद्धावस्थेत पडून होता. दुचाकीच्या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. शस्त्रक्रियेसाठी किमान दीड लाखांचा खर्च येणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले; मात्र त्याची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने तो खर्च करण्यास असमर्थ ठरत आहे. दरम्यान, गावातील राधेश्यामच्या काही मित्रांनी पुढाकार घेऊन मदतीची याचना करणे सुरू केले आहे.
..................
‘राधेश्याम’चे बँकेत खातेही नाही
राधेश्यामने अद्यापही कुठल्याच बँकेत खाते काढलेले नाही. त्यामुळे मदतकर्त्यांनी ‘गुगल’, ‘फोन पे’व्दारे मदत करावी, असे आवाहन जय किसान मित्र मंडळाने केले आहे.