संत सुखमाता यात्राैत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:13+5:302021-02-13T04:39:13+5:30
पंचक्रोशीतील व पंचक्रोशीच्या बाहेरील भाविक भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या येथील विदेही संत सखुमाता यांचा यात्रा महोत्सव दरवर्षी धर्मनाथ बीजवर ...

संत सुखमाता यात्राैत्सव रद्द
पंचक्रोशीतील व पंचक्रोशीच्या बाहेरील भाविक भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या येथील विदेही संत सखुमाता यांचा यात्रा महोत्सव दरवर्षी धर्मनाथ बीजवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो , मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने घालून दिलेल्या नियमाचे व अटीचे काटेकोरपणे पालन करुन साजरा केला जाणार आहे. या यात्रा महोत्सवाला ६ फेब्रुवारीपासून संगीतमय भागवत सप्ताहाने सुरूवात झाली असून सीताराम सावदे महाराज (पार्डी आसरा) यांच्या वाणीतून दररोज दुपारी २ ते ५ या दरम्यान भागवत कथेचे वाचन करण्यात येत आहे. तर त्यांना महादेवराव डकरे ,कृष्णाजी कांबळे, उकंडराव चव्हाण हे साथ संगत देत आहेत. तसेच आरती,पूजा, भजन,आदी धार्मिक कार्यक्रमसुद्धा कोरोना नियमांचे पालन करुनच साजरे करण्यात येत आहेत कुठल्याही दुकानदारांनी,व्यापाऱ्यांनी आपली दुकाने येथे लावू नये .तसेच १३ फेब्रुवारी शनिवार रोजी होणाऱ्या महाप्रसाद वाटपाला सुद्धा भाविक भक्तांनी मंदिरावर व मंदिर परिसरात गर्दी करु नये. सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष गणेश कैलासराव नागरे यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थानचे अध्यक्ष गणेश नागरे,उपाध्यक्ष गजानन पोफळकर, विश्वस्त प्रमोद गोंडाळ,अजय व्यास,विजय बोबडे, रामकुमार अग्रवाल, अशोक डिवरे, शंकर भुजाडे, नारायणराव घुगे, अमोल देशमाने .बबलू पवार, धोंडू नालिंदे,पुजारी सदानंद सरोदे,व गावकरी मंडळी परिश्रम घेत आहेत,