शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi Special: संत गजानन महाराज यांची पालखी शनिवारी शिरपुरात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 16:57 IST

आषाढी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शुक्रवार १४ जून रोजी जिल्ह्यात आगमन होत आहे.

वाशिम - आषाढी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शुक्रवार १४ जून रोजी जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यानंतर शनिवार १५ जून रोजी ही पालखी शिरपूर जैन येथे दाखल होणार असून, पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी शिरपूरवासियांकडून करण्यात येत आहे. मागील ५२ वर्षांपासून श्री क्षेत्र शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी उत्सवासाठी पंढरपूर येथे जात असते. यावर्षीही श्रींची पालखी ६ जून रोजी शेगाव येथून मार्गस्थ झालेली आहे. श्रींची पालखी अकोला मार्गे वाडेगाव पातूर येथून १४ जून रोजी वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत गजानन भक्त श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत. ही पालखी १४ जून रोजी मेडशी येथील भोजन व विश्रांती आटोपून श्री क्षेत्र डव्हा येथे मुक्कामी राहील. १५ जून रोजी पालखी डव्हा येथून मालेगावकडे रवाना होईल. मार्गात नागरतास येथे भाविकांच्यावतीने पालखीचे भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पालखी मालेगाव शहरात दाखल होईल.  शहरातील भाविकांनी भक्ती व उत्साहपूर्ण वातावरणात श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी चालविली आहे. दरवर्षी प्रमाणे मालेगाव येथे श्रींच्या पालखी सोहळ्यात सहभागी ७०० वारकºयांसह भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विश्रांतीनंतर श्रींची पालखी शिरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करेल. या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी भाविकांनी केली आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीGajanan Maharajगजानन महाराज