सामाजिक कार्यकर्त्यांकडून सॅनिटायझर फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:42 IST2021-05-13T04:42:04+5:302021-05-13T04:42:04+5:30

जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने ९ ते १५ मे या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यासह वाशिम शहरातही कडक निर्बंध ...

Sanitizer spray from social workers | सामाजिक कार्यकर्त्यांकडून सॅनिटायझर फवारणी

सामाजिक कार्यकर्त्यांकडून सॅनिटायझर फवारणी

जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने ९ ते १५ मे या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यासह वाशिम शहरातही कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत असून, दिवसभर रस्ते निर्मनुष्य राहत आहेत. अशावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वखर्चाने शहर सॅनिटाईज करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा मार्गदर्शनात युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख यांनी या कार्यात विशेष पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत शहरातील बहुतांश भागात निर्जंतुकीकरणाचे कार्य पूर्ण झाले असून, पुढील काही दिवसात संपूर्ण शहर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नगरसेवक तथा युवा मोर्चा जिल्हा सचिव अमित मानकर यांनी सांगितले. या उपक्रमात अभिजित चव्हाण, प्रणव बोलवार, अजय पवार, धनंजय घुगे, श्रीपाद कुकडी, विश्वास ब्रम्हेकर, सुमीत वर्मा, आशुतोष निरखी, नगरसेवक अनिल ताजने, संदीप पंचभाई, प्रतीक वर्मा, पवन कणखर आदींनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Sanitizer spray from social workers