जनशिक्षण संस्थानतर्फे स्वच्छता पंधरवडा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST2021-07-21T04:27:02+5:302021-07-21T04:27:02+5:30
यावेळी जनशिक्षण संस्थानचे संचालक मोहम्मद शोएब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. जनशिक्षण संस्थानचे कार्यक्रम अधिकारी के. के. अंभोरे यांनी ...

जनशिक्षण संस्थानतर्फे स्वच्छता पंधरवडा साजरा
यावेळी जनशिक्षण संस्थानचे संचालक मोहम्मद शोएब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. जनशिक्षण संस्थानचे कार्यक्रम अधिकारी के. के. अंभोरे यांनी गव्हा, तांदळी व काटा येथे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छतेबाबत वर्धमान कांबळे यांनी मार्गदर्शन केले. काटा येथे आशाताई देशमुख यांनी कोविडबाबत माहिती दिली. गव्हा येथील सरपंच भगत यांची माहिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अंजली वर्धमान कांबळे, झनकराव देशमुख, संदीप देशमुख, शंकर देशमुख, देवराव कांबळे, प्रताप कांबळे, गणेश देशमुख, संजय जाधव, धम्मपाल पडघान यांची उपस्थिती होती. जनशिक्षण संस्थानचे के. के. अंभोरे, राजू मनवर, संदीप देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते.
००००
स्वच्छतेवर गीत गायन
कलावंतांनी स्वच्छतेवर गीत सादर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजूनही कायम आहे. आरोग्याच्या सुरक्षीततेसाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. कुठेही गर्दी करू नका, असे आवाहन कलावंतांनी केले.