अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री; सात आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:06+5:302021-04-25T04:40:06+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वाल्मीकी नगर येथे राहणाऱ्या कल्पना अशोक पवार यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी ...

Sale of underage girls abroad; Seven accused arrested | अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री; सात आरोपींना अटक

अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री; सात आरोपींना अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वाल्मीकी नगर येथे राहणाऱ्या कल्पना अशोक पवार यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी सदर प्रकरणी तक्रार दिली की, बहिणीच्या नवऱ्याच्या निधनानंतर बहिणीच्या ११ व ८ वर्षांच्या दोन मुलींना नातेवाईक असलेल्या घनशाम रामकिसन पवार रा. हदगाव, जिल्हा यवतमाळ व जयंत पवार रा. बोरी यवतमाळ यांनी फिरावयाच्या बहाण्याने मुंबई येथे नेले. त्यानंतर मोठ्या मुलीला (११) राजस्थान येथे चार लाख रुपयात विकले आणि मुलगी न सांगता पळून गेली अशी थाप आरोपीने फिर्यादीस मारली. या पीडित मुलीला राजस्थानातील डागरा येथे विकल्यानंतर संदीप हनुमानसिंग बांगडवा या आरोपीसोबत तिचे लग्न लावून दिले. आरोपी संदीप बांगडवा याने अल्पवयीन पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले तसेच मदन हनुमानसिंग बांगडवा, राकेश हनुमानसिंग बांगडवा यांनी सदर मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून पीडित मुलीने तेथून पळ काढून गुजरात गाठले. या घटनेची माहिती पीडित मुलीने बारडोली पोलिसांना दिली. बारडोली पोलिसांनी वाशिम पोलिसांना काळविल्यानंतर या माहितीच्या आधारे वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी घनश्याम पवार व राजेंद्र पवार यांना अटक करून ताब्यात घेतले. त्यानंतर एक पथक गुजरातमध्ये पाठवून पीडित मुलीला ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींनी सुभाष पवारबाबत सदर गुन्ह्यातील सहभाग असल्याची माहिती दिल्यानंतर सुभाष पवारला पालघर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीडित मुलीला वाशिम येथे आल्यानंतर तिने घनश्याम रामकिसन पवार, जयेंद्र रामकिसन पवार व सुभाष श्यामराव पवार यांनी चार लाख रुपयात मदन हनुमानसिंग बांगडवा, राकेश हनुमानसिंग बांगडवा व संदीप हनुमानसिंग बांगडवा यांना विकल्याची माहिती दिली. वाशिम शहर पोलिसांनी लगेच राजस्थान गाठून या तिन्ही आरोपींना राजस्थानातून अटक केल्यानंतर या प्रकरणामध्ये घनश्याम पवार व राजेंद्र पवार यांच्यासह मुलीला विकण्यास मदत करणाऱ्या इस्लाम खान दौलत खान, रा. दिग्रस यालासुद्धा अटक केली आहे. मदन हनुमानसिंग बांगडवा, राकेश हनुमानसिंग बांगडवा व संदीप हनुमानसिंग बांगडवा या तीन आरोपींना २६ एप्रिलपर्यंत पोलीस काेठडी मिळाली आहे.

शहर पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे शहर पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकार, सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ, अनिल पाटील, गणेश सरनाईक, विजय घुगे, लालमणी श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, ज्ञानदेव मात्रे, सुभाष राठोड, विठ्ठल महाले, प्रवीण गायकवाड, मनोज पवार, तेजस्विनी खोडके व सायबर पथकाचे दीपक घुगे यांच्या पथकाने केली.

Web Title: Sale of underage girls abroad; Seven accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.