संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा

By Admin | Updated: July 26, 2014 22:32 IST2014-07-26T22:32:50+5:302014-07-26T22:32:50+5:30

महाप्रसादाला अलोट गर्दी

Saints Savta Mali Punyathithi Soula | संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा

संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा

शिरपूरजैन : येथे २५ जूलै रोजी संत सावता माळी यांच्या पूण्यतिथिनिमीत्त आयोजीत भागवत कथेची २५ जूलै रोजी शोभायात्रेसह महाप्रसादाने सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत सहभागी हजारो नागरिकांनी आयोजीत महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानिक संत सावतामाळी मंदिरामध्ये १८ जूलैपासून संत सावता माळी यांच्या पूण्यतिथी सोहळ्य़ास सुरुवात करण्यात आली होती. ह. भ. प. विश्‍वनाथ महाराज वसारी यांनी सप्ताहभर आपल्या सुमधूर वाणीतून श्रीमद भागवत कथेचे वाचन केले. सप्ताहभर, प्रवचन हरिपाठ, भजनासह दररोजी विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा या पूण्यतिथी सोहळ्य़ाच्या माध्यमातून शिरपूरवासियांना घडली. २५ जूलै रोजी पूण्यतिथीचा मुख्य दिवस असल्याने सकाळी मंदिरातून संत सावता माळी यांच्या पालखीची व प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गावातील कानडी वेटाळ मार्गे शोभायात्रा महात्मा फूले वेटाळात आली असता डॉ. श्याम गाभणे यांच्या निवासस्थानी व इरतकर वेटाळात शोभायात्रेतील भाविकांना चहापानाचे वाटप करण्यात आले. पोलिसस्टेशनसमोरुन बसथांबा परिसरातून जैन मंदिर चौकातून शोभायात्रा पून्हा सावता माळी मंदिराकडे रवाना झाली. या शोभायात्रेत हर..हर..महादेव.. सावतामाळी कि जय.. च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणेने आसमंत दणानून गेला होता. दूपारी ह.भ.प. सुधाकर पंत, दीक्षीत गुरुजी यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Saints Savta Mali Punyathithi Soula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.