संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:06+5:302021-02-05T09:24:06+5:30
यावेळी संत भगवान बाबा यांच्या महान कार्याला उजाळा देण्यात आला. संत तुकाराम महाराज यांच्या 'पवित्र सोवळी,तिच एक भुमंडळी,ज्याचा आवडता ...

संत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा
यावेळी संत भगवान बाबा यांच्या महान कार्याला उजाळा देण्यात आला. संत तुकाराम महाराज यांच्या 'पवित्र सोवळी,तिच एक भुमंडळी,ज्याचा आवडता देव,अखंडित प्रेमभाव,तिच भाग्यवंत सरती पुरती धनवित्ते,तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा,या चार चरणांच्या आधारे ह.भ.प.दिनकर महाराज यांनी कीर्तन केले. संत भगवान बाबा हे ऐश्वर्य संपन्न होते. बहुजनांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नात होते. मानवांनी आपल्या दैनंदिन कामासोबत मनशांतीसाठी भगवंताचे नामस्मरण करणे आवश्यक आसल्याची शिकवण संतांनी दिली. संत भगवान बाबा यांनी शिक्षणा सोबतच शेती,व्यवसाय लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असल्याचे आपल्या ग्रंथामध्ये विषद केलेले आहे .तेव्हा संत तुकाराम महाराज यांच्या वरील अभंगाच्या आधारे हरिकीर्तन संपन्न झाले. यावेळी भरजहाॅंगीर,मोरगव्हाणवाडी,चाकोली येथील भजनी मंडळीने मोलाचे सहकार्य केले. शेकडो समाज बांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.